top of page

About us

अप्रूप म्हणजे कौतुक, नवल !हेच नवल प्रत्येकाचे मनोरंजन करत असते. काहींना यातून जीवनानुभूती मिळते तर कधी कधी एखादा अनुभव लक्षात राहण्यास मदत होते. तेंव्हा प्रत्येक कलाकृतीतुन अप्रूप भाव निर्मण करावा असं वाटत असतं.

चित्रपटनिर्मितीच्या या कुतूहलकारी क्षेत्रात संचारत असल्यामुळे मानवी जीवनातील अचाट अनुभव आणि कल्पनेतुन साकारलेल्या कलाकृती दृश्यस्वरूपात प्रेक्षकांसमोर प्रांजळपणे मांडणे हेच आमचं साधं सरळ ध्येय !

तसे पाहिले तर गेल्या आठ वर्षांपासून आम्ही या क्षेत्रात काम करतोय पण ‘अप्रूप’ या नावानिशी काम करायला आज ४ वर्षे होत आहेत. लघुचित्रपट, माहितीपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या यशस्वी कथा कलात्मक धाटणीने मांडल्यात आणि मांडत राहू.

आम्ही ग्राहकांचे व्यवसाय अभ्यासतो, त्यातील बारकावे तपासून व्यवस्थितरीत्या त्यांच्या व्यवसायाची गाथा कशी लोकांपर्यंत पोहचवता येईल हे पाहतो. यामुळे प्रत्येक कलाकृतीत एक नावीन्यपूर्णता जपण्याचा हमखास प्रयत्न होतो. त्यांच्याही चेहऱ्यावर हा अप्रूप भाव प्रकट झाला की आम्ही कलाकार मंडळी आनंदी होतो. यावेळी विलक्षण आत्मिक समाधान मिळते. आम्ही एखाद्या कल्पनेपासून ते कलाकृतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वकाही करतो. यासाठी जीव ओतून टीममधले कलाकार मित्र काम करतात.

या अप्रूप जगात तुमचं स्वागत आहे!

WE CLEBRATE OUR FEEDBACKS!.png

© Aproop Productions LLP. All rights reserved.

bottom of page